म्हटलं की गरमागरम चहा/कॉफी सोबत काहीतरी चमचमीत खाण्याचं मन होतंच.
म्हणुन यावेळी तेलकट भज्यांचा, वड्यांचा अनहेल्दी घाट घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं पण पौष्टिक करून बघा.
अंडी खाणार्यांसाठी स्पेशल 🥚
अंड्यांचे आप्पे विथ चीझ
(Egg Balls stuffed with cheese)
साहित्य :
५ अंडी
२ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चिरलेला टोमॅटो
४-५ कढीपत्त्याची पूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ काळीमिरी पूड
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून पावभाजी मसाला (असल्यास)
१/४ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
कृती :
एका खोलगट भांड्यात अंडी फोडून घ्या. फेस येईपर्यंत फेटून घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, काळीमिरी पूड, लाल तिखट, पावभाजी मसाला (असल्यास), हळद, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा फेटून घ्या.
आप्प्यांच्या भांड्यातील प्रत्येक भागात एक-एक थेंब तेल टाकून घ्या. मग त्यात एक चमचा अंड्यांचे मिश्रण घालून त्यावर चीझचा छोटा तुकडा (असल्यास) ठेवा. पुन्हा त्यावर अंड्यांचे मिश्रण टाका आणि १ मिनिट झाकण ठेऊन शेकून घ्या. चमच्याच्या साहाय्याने अलगद फिरवून दुसर्याबाजूनेही शेकून घ्या.
तयार आहेत कमी तेलात बनवलेले खमंग "अंड्यांचे आप्पे विथ चीझ" (Egg Balls stuffed with cheese).
हे आप्पे पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस किंवा मेयोनिझ सोबत सर्व्ह करा.
नक्की करून पाहा.
(टीप: एखाद्या पदार्थात टाकलेला कढीपत्ता आपण खात नाही, काढून फेकून देतो. त्याऐवजी कढीपत्त्याची पाने धुवून कडक उन्हात वाळायला ठेवा. सुकल्यावर मिक्सर मध्ये वाटून त्याची पूड तयार करा. मग ही कढीपत्त्याची पूड पदार्थ बनवताना वापरा.)
👍👍
उत्तर द्याहटवाफोटो सामायिक केला असता तर आणखी मजा आली असती..
उत्तर द्याहटवा